आयकर विभागाने लालू प्रसाद यादव यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती, तिचे पती शैलेश कुमार, तसेच लालूप्रसाद यादव यांच्या इतर दोन मुली रागिणी आणि चंदा, तसेच मुलगा तेजस्वी यादव यांच्या नावे असलेले १२ प्लॉट जप्त केले आहे.