मध्यप्रदेशात पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

रविवार, 1 ऑगस्ट 2021 (17:14 IST)
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात संततधार पावसाने उच्छाद मांडला आहे.सततच्या पावसामुळे नदीला पूर आला आहे. अनेक घरे पावसामुळे कोसळली आहे.अशा परिस्थितीत मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील बहेरा घुचीयारी गावात पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण दबले गेले त्या पाच पैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त मिळत आहे.
 
मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींपैकी केमली देवी वयवर्षे 70,मनोज पांडे वयवर्षे 27,काजल पांडे वयवर्षे 80,अनन्या पांडे वयवर्षे 4 आहेत.तर आंचल पांडे वयवर्षे 6 ही मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे.तिला तांडतोब रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती