आसामच्या तेजपुरमध्ये लढाऊ विमान सुखोई अपघातग्रस्त, दोन्ही पायलट सुखरूप

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (12:22 IST)
भारतीय वायुसेनेचे का सुखोई लढाऊ विमान गुरुवारी रात्री आसामामध्ये तेजपुरजवळ अपघातग्रस्त झाले. रक्षा प्रवक्ते लेफ्टिनेंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी सांगितले की विमानातील दोन्ही वैमानिक विमानातून सुखरूप बाहेर पडले असून त्यांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की त्यातून एका पायलटच्या पायाला जखम झाली आहे.  
 
सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु रात्री साडेआठच्या सुमारास हे विमान अपघातग्रस्त झाले आणि एका शेतात पडले. त्यानंतर त्या विमानात आग लागल्याचे पांडे यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी दोन्ही वैमानिकांना नजिकच्या सैन्याच्या रूग्णालयात दाखल केले असल्याचे ते म्हणाले.
 
या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती