धर्माच्या नावे दाढी वाढवू नका - सुप्रीम कोर्ट

फक्त आणि फक्त धार्मिक कारण देऊन कोणताही  सैनिक किंवा हवाई दलातल्या कुठल्याही जवानाला किंवा अधिकाऱ्याला दाढी वाढवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.त्यामुळे आता या मागणीवर पडदा पडला आहे.

वायुदलाचे जवान मोहम्मद झुबेर आणि अन्सारी आफताब अहमद यांनी आपल्याला धार्मिक कारणावरुन दाढी वाढवण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.  

धार्मिकता हे कारण पुढे करता येणार नसल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. शीख आणि मुस्लिम समुदायाला दिलेल्या सवलतीचाही मुद्दा कोर्टापुढे मांडला होता. मात्र कोर्टानं तो अमान्य केला तर कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

वेबदुनिया वर वाचा