हैदराबाद राहिली नाही आंध्र प्रदेशची राजधानी, जाणून घ्या या मागील कारण

सोमवार, 3 जून 2024 (13:06 IST)
Telangana- Andhra Pradesh Capital : वर्ष 2014 मध्ये आंध्र प्रदेश पासून वेगळे होऊन तेलंगणा राज्य बनले होते, तेव्हापासून दोघांची राजधानी हैद्राबाद होती. पण अधिनियमनुसार फक्त दहा वर्षासाठी हैदराबाद, आंध्र प्रदेशची राजधानी होती. 
 
Telangana- Andhra Pradesh Capital : एक जून पासून देशामध्ये अनेक बदल झाले. पण 2 जून ला एक प्रदेशची राजधानी बदलली. हैदराबाद, देशातील सर्वात व्यस्त आणि गर्दी असणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हैदराबाद दोन राज्यांची राजधानी होती. पण आता फक्त एका राज्याची राजधानी आहे. 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन नंतर तेलंगणा नवीन राज्य बनले होते, यानंतर दोघांची राजधानी हैद्राबाद होती. 
 
हैदराबाद आता आंध्रप्रदेशची राजधानी नाही
2 जून 2014 ला आंध्र प्रदेश मधून वेगळी होऊन तेलंगणा राज्य बनले होते.  तेव्हापासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची राजधानी हैद्राबाद होती. पण 2 जून 2024 पासून हैद्राबाद फक्त तेलंगणाची राजधानी आहे.  
 
10 वर्षांसाठी दोन राज्यांची राजधानी होती हैद्राबाद 
2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर तेलंगणा बनले आणि हैद्राबादला 10 वर्षांसाठी दोघी राज्यांची राजधानी बनवले गेले. 2 जून 2024 ला दहा वर्ष पूर्ण झाले, पहिल्यापासून ठरवलेल्या आंध्र प्रदेश पुनर्गठन अधिनियम नुसार आता प्रदेशासाठी नवीन राजधानी बनवावी लागेल.
 
दोन्ही राज्यांमध्ये अनेक वाद 
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये अनेक प्रकरणांना घेऊन वाद आहे. सर्वात मोठा वाद संपत्ति विभाजन ला घेऊन आहे. सांगितले जाते आहे की, मागील महिन्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी ने त्या सरकारी गेस्ट हाउसला परत घेण्यासाठी सांगितले होते जे आंध्रप्रदेशाला दिले गेले आहे. 

Edited By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती