देशात 17 राज्यांमध्ये तापमान 40 डिग्रीहून अधिक, बूंदी दुनियेतील सर्वात हॉट सिटी

देशात उष्णतेमुळे तापत आहे. उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट असल्याने लोकांची हाल होत आहे. मंगळवारी देशातील 17 राज्यांचे तापमान 40 डिग्रीहून अधिक होते.
 
राजस्थानच्या बूंदी येथे 48 डिग्री तापमान नोंदले गेले. 22 मे रोजी बूंदी दुनियेतील सर्वात अधिक तापमान असलेलं शहर ठरलं. हे इजिप्त येथील बहारिया या शहरासोबत सर्वात अधिक जागा ठरली.
 
हवामान विभागाप्रमाणे, सेंट्रल पाकिस्तान आणि राजस्थानमध्ये मागील दोन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. राजस्थानहून 30 ते 35 किमी गतीने उष्णतेच्या लाटा दिल्ली पोहचत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या कराचीमध्ये भयंकर लू मुळे तीन दिवसात 65 लोकांची मृत्यू झाली आहे. येथे मागील काही दिवसांपासून तापमान सामान्य ते 10 डिग्री अधिक आहे.
 
मध्यप्रदेशमध्ये श्योपुर सर्वात उष्ण शहर राहिले. येथे 46.4 डिग्री तापमान नोंदले गेले. मध्यप्रदेशातील नोगांव (बुंदेलखंड), राजगड, शाजापूर आणि उमरिया येथे तापमान 45.6 डिग्री होता. तसेच महाराष्ट्राच्या वर्धा मध्ये 45.8 डिग्री, उत्तर प्रदेशच्या बांदा येथे 46.2 डिग्री तापमान नोंदले गेले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती