आधी परवानगी घ्या मग सोशल मीडिया वापरा: गृहमंत्रालय

'पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरता येणार नाही' असे आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.  

बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचे व्हिडिओ लागोपाठ समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे यापुढे पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडियांचा वापर संमतीशिवाय करता येणार नाही. तसेच कुठलेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओही त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत.

जवानांना सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकायची असेल तर त्यापूर्वी त्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे, आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा