या व्यतिरिक्त सर्वात उंच शिव मूर्ती नेपाळ येथील कैलाशनाथ मंदिर (143 फूट), कर्नाटक येथे मुरुदेश्वर मंदिर (123 फूट), तामिळनाडू येथील आदियोग मंदिर (112 फूट), आणि मॉरिशस येथे मंगल महादेव (108 फूट) स्थापित केलेल्या आहेत.
जगातील सर्वात उंच शिव मूर्ती मिराज ग्रुप तयार करत आहे. भव्य शिव मूर्ती तयार करण्यासाठी 3000 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन अंदाजे 30 हजार टन असेल. शिवच्या हातातील त्रिशूल 315 फूट उंच आहे. मुर्तीमध्ये चार लिफ्ट असून 280 फुटापर्यंत पर्यटक जाऊ शकतील अशी सोय करण्यात आली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी 750 कारागीर दररोज काम करत आहे.