पोलिस उपअधीक्षक दिव्यप्रकाश गोहिल यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याला १७ जुलै रोजी एक ईमेल मिळाला होता, ज्यामध्ये पाठवणाऱ्याने राज्याच्या राजधानीतील मुख्यमंत्री कार्यालय आणि सचिवालय परिसर उडवून देण्याची धमकी दिली होती. ते म्हणाले, "गांधीनगर पोलिसांनी त्याच दिवशी कारवाई केली आणि बॉम्ब पथक आणि इतर एजन्सींच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली." अधिकाऱ्याने सांगितले की, धमकी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.तसेच शोध मोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही. ते म्हणाले, "अज्ञात संदेश पाठवणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे."