लोकसभेमध्ये जीएसटी (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स)शी संबंधित चार महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळाली आहे. जीएसटी संदर्भात विधेयकांना लोकसभेत हिरवा कंदील मिळाला आहे.
यात इंटिग्रेटेड किंवा एकीकृत जीएसटी (आयजीएसटी/IGST), सेंट्रल जीएसटी (सीजीएसटी/CGST), युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश जीएसटी (यूटी जीएसटी/UTGST) आणि जीएसटी कॉम्पेन्सेशन बिल ही चार विधेयक लोकसभेत पारित झाली.
पाचवं विधेयक (एसजीएसटी/SGST) प्रत्येक राज्याने मंजूर करायचं आहे. 1 जुलै पासून जीएसटी कायद्याची अंमलबजावणी करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.