आज GSLV मार्क-3 चं प्रक्षेपण

सोमवार, 5 जून 2017 (14:04 IST)
आज 5 वाजून 8 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून इस्त्रो जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करणार आहे.
 
जास्त वजनाचे कम्युनिकेशन सॅटेलाईट जीएसएटी – 19 चा जिओटीमध्ये  (जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट) प्रवेश करणे जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करण्यामागचा मुख्य उद्धेश असल्याचं इस्त्रोचे चेअरमन ए एस किरण कुमार यांनी सांगितलं आहे.
 
जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करण्यासाठी जास्त वेगाच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे.
 
विशेष म्हणजे इस्त्रोने तब्बल 30 वर्ष संशोधन करत हे इंजिन तयार केलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा