‘जीसॅट-9’चं यशस्वी प्रक्षेपण

शनिवार, 6 मे 2017 (09:35 IST)

श्रीहरीकोटातून इस्रोच्या ‘जीसॅट-9’चं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. हे रॉकेट सार्क देशांचा खास उपग्रह घेऊन अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं आहे. नॉटी बॉय नावानंही हे रॉकेट ओळखलं जातं.

जीसॅट-9 च्या निर्मितीसाठी 235 कोटींचा खर्च आला आहे.  देशांसाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सार्क देशांतील आठपैकी सात सदस्य या प्रकल्पाचा भाग आहेत. पाकिस्तानने त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.   

वेबदुनिया वर वाचा