सरकार आणणार मोहाची 'दारू'

बुधवार, 11 मार्च 2020 (16:44 IST)
दारूच्या विक्रीतून मिळणार्‍या टॅक्सद्वारे कोणत्याही राज्याला सर्वाधिक महसून मिळतो, असे सारेचबोलतात. पण, जर सरकारच दारू बाजारात आणणार आहे असे म्हटले तर विश्वास बसणार नाही, हो ना? पण, असेच काही होऊ घातले आणि त्यासाठीचा करारही झाला आहे. शिवाय त्या दारूच्या बॉटलची किंमतही ठरली आहे. 
 
सरकारने मोहाची दारू लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या दारूमध्ये अल्कोहोलही असेल. पहिल्यांदाच सरकार असे करणार आहे. या दारूला महुआ न्यूट्रिबेव्हरेज असे नाव दिले आहे. येत्या महिन्याभरात याची विक्री सुरू केली जाण्याची शक्यता आहे. या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी सांगितले की, सध्या आम्हाला या पेयासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगीची गरज आहे. त्यानंतर दिल्लीतील पाच ठिकाणी हे पेय विकले जाणार आहे. ट्राइब्स इंडिया नावाच्या स्टोअर्समध्ये हे पेय मिळेल. त्याची किंमत 750 एम एलच्या बॉटलसाठी 750 रूपये इतकी आहे. हे पेय सहा प्रकारच्या फळांच्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असेल. या पेयाच्या निर्मितीसाठी या महामंडळाने राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेशी करार केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती