इंग्रजी आणि मल्याळमच्या प्रसिद्ध लेखिका कमला दास यांना आज गुगलने डुडलमार्फत मानवंदना दिली आहे. त्यांचा जन्म ३१ मार्च १९३४ रोजी केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात झाला. ३१ मे २००९ ला पुणे येथे त्यांचे निधन झाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह कलकत्त्यातील माधव दास यांच्यासोबत झाला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना कमला सुरैया नावाने ओळखले जाऊ लागले.
लहानपणापासूनच त्यांना कविता लिहिण्याची आवड होती. त्यांची आई बालमणि अम्मा यांचा प्रभाव कमला दास यांच्यावर झाला. कमला दास यांची आत्मकथा 'मेरी कहानी' वादग्रस्त ठरली. ही आत्मकथा भारतातील प्रत्येक भाषेंसोबतच पंधरा विदेशी भाषांमध्ये अनुवादीत झाली. आंतरराष्ट्रीय साहित्यात कमला दास यांच्या साहित्याची दखल घेतली गेली. १९८४ साली नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले.
कमला दास यांना मिळालेले पुरस्कार
वर्ष १९८४ साली नोबेल नामांकन
अॅवार्ड ऑफ एशियन पेन एंथोलोजी (१९६४)