दिलासादायक बातमी! खाद्य तेल,डाळी लवकरच स्वस्त होणार

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (10:21 IST)
भारत कृषी प्रधान देश आहे.भारताची ओळख एक कृषी निर्यातक देश म्हणून निर्माण होत आहे. भारत प्रथमच कृषी निर्यातक म्हणून कृषी निर्यातीत देशांच्या पहिल्या 10 देशांचा यादीत पोहोचला आहे.सोमवारी पंत प्रधान मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेचा नववा हफ्ता जारी करताना देशाला डाळी आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.या साठी त्यांनी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ऑइल पाम मिशनची घोषणा केली.या मध्ये तब्बल 11 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली जाणार असे पंत प्रधानांनी सांगितले. 
 
 पंतप्रधान म्हणाले की,या मिशन मुळे डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत भारत देश आत्मनिर्भर होईल आणि आपल्या देशातील शेतकरी असं करू शकतील.ते म्हणाले की,गहू तांदूळ,आणि साखर मध्येच नव्हे तर डाळी आणि खाद्य तेलाच्या बाबतीतही आत्मनिर्भरता असावी.
 
भारताला सुरुवातीला डाळ आयात करावी लागायची.परंतु आता स्थिती बदलली आहे.भारतात गेल्या सहा वर्षात डाळीचे उत्पादन 50 टक्क्यांनी वाढले आहे.आता खाद्य तेलाच्या उत्पादनाच्या बाबतीत देखील असे करावे लागणार. या साठी आपल्याला वेगानं काम करावे लागणार जेणे करून खाद्य तेलाच्या उत्पादनाच्या बाबतीत देखील देश आत्मनिर्भर बनेल.या खाद्य तेल मिशन मुळे आपल्याला खाद्य तेलासाठी इतरआयातीवर निर्भर राहावे लागणार नाही. सरकार कडून शेतकऱ्यांना या संदर्भात सर्व सुविधा पुरवल्या जातील.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती