गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप काढण्याचा निर्णय सरकारने निर्णय घेतला आहे. यापुढे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुले राहुल, प्रियंका गांधी वड्रा यांना आता झेड प्लस कॅटेगरीची सुरक्षा असेल.
नुकताच सुरक्षेसंदर्भातील आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एसपीजी ही पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा संभाळणारी पहिली एलिट फोर्स आहे. यामध्ये ३००० अधिकारी आहेत. एसपीजीकडे आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. झेड प्लसमध्ये गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) असेल.