त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सीमाप्रश्‍नी सुनावणी

मंगळवार, 29 जानेवारी 2019 (10:16 IST)
कर्नाटक सीमाप्रश्‍नी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे, त्यामध्ये एक न्यायमूर्ती मूळचे कर्नाटकाचे असल्याने उद्याची सुनावणी रेंगाळण्याची शक्यता आहे. गेल्या वेळची सुनावणी याच कारणासाठी पुढे ढकलण्यात आली होती.
 
दरम्यान, सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी सीमावासीयांच्या वतीने मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, न्यायालयीन कामकाज समन्वयक अ‍ॅड. राजाभाऊ पाटील दिल्लीत तळ ठोकून आहेत.  महाराष्ट्राच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. हरीष साळवे व अ‍ॅड. राजू रामचंद्रन बाजू मांडणार आहेत. या त्रिसदस्यीय खंडपीठात न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा, न्या. मोहन शांतगौडर, न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे. मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाल्यास कर्नाटकाच्या अंतरिम अर्जावर निर्णय होईल. यामध्ये कलम 131 नुसार मत मांडण्याची तयारी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती