नुपूर शर्मा वाद : नुपूरच्या वक्तव्यावरून लखनौ ते कोलकाता गोंधळ, रांचीमध्ये गोळीबार, दगडफेकीत अनेक पोलीस जखमी

शुक्रवार, 10 जून 2022 (16:45 IST)
Nupur Sharma Dispute:पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद थांबताना दिसत नाही. शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. 
 
दिल्लीतील जामा मशिदीपासून ते कोलकाता आणि यूपीच्या अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात उग्र निदर्शने झाली .प्रयागराजमध्ये आंदोलकांनी दगडफेक केली. हावडा येथेही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.  हावडा येथेही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.  
 
लखनौ- देवबंदमध्ये गोंधळ, यूपीची राजधानी लखनौ-शिवाय देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूरमध्येही मोठा गोंधळ झाला .देवबंदमध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.  
 
जामा मशिदीतील आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाईची मागणी केली. यासोबतच लोकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.  
 
आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  जामा मशिदीच्या शाही इमामाचे म्हणणे आहे की, त्यांना या निषेधाबद्दल काहीही माहिती नाही.  तसेच मशिदीकडून आंदोलन पुकारण्यात आले नाही. शाही इमाम म्हणाले, त्यांना माहित नव्हते की जामा मशिदीबाहेर असे कोणतेही निदर्शन होणार आहे. तसेच जामा मशिदीने आंदोलन पुकारले नव्हते, असेही ते म्हणाले. 
 
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये काही ठिकाणी नुपूर शर्मा, राजा सिंह आणि इतरांविरोधात निदर्शने होत आहेत. हैदराबादमधील मक्का मशीद, चार मिनार, अजीझिया मस्जिद, हुमायून नगर, मस्जिद-ए-कुबा, वाडी-ए-मुस्तफा, मस्जिद-ए-सयदना उमर फारूक, चंद्रयांगुट्टा आणि इतर ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी बाहेर पडून निषेध केला. आंदोलकांनी नुपूर शर्मा, राजा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
 
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम समाजातील लोकांनी शुक्रवारी रांचीच्या मुख्य रस्त्यावर हिंसक निदर्शने केली. मावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.  पोलिसांनी लाठीमार केला तेव्हा जमावाकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. 
 
त्यानंतरच गर्दीवर नियंत्रण मिळवता आले. याआधी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाजातील लोक राजधानीच्या रस्त्यावर उतरले होते. नी आपली दुकाने बंद ठेवली आणि इतर दुकानदारांनाही त्यांची दुकाने बंद करण्यास सांगितले. दोरंडा परिसरातील दुकानेही त्यांनी बंद केली.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती