त्या १ डिसेंबरपासून देशभरात ड्रोनच्या उड्डाणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.केंद्रीय नागरी हवाई उड्डयाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भातील धोरण जाहीर केले आहे. ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वस्तूंची डिलिव्हरी ड्रोनद्वारे होऊ शकते.विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, दिल्लीतला विजय चौक, राज्यातील सचिवालय, लष्करी तळ या ठिकाणी ड्रोनला नो फ्लाय झोन असेल. म्हणजे इथे ड्रोन उडवता येणार नाही.
मात्र यासोबत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. ड्रोनचा सुरळीत वापर सुरु राहिल्यास त्या अटींमधून दिलासाही मिळणार आहे. वजनानुसार ड्रोनची पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वात छोटो नॅनो ड्रोन ज्याचे वजन २५० ग्रॅम असेल. सर्वात वजनदार १५० किलोचे ड्रोन असेल. ड्रोनचे परवाने हवे असतील त्यांची वयोमर्यादा १८ पेक्षा जास्त असली पाहिजे तसेच दहावीपर्यंतच्य शिक्षणाबरोबर त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.