बहराइच येथे कालव्यामध्ये बुडाल्याने चार मुलांचा मृत्यू
गुरूवार, 2 मे 2024 (09:58 IST)
उत्तर प्रदेश मधील बहराइच जिल्ह्यात कालव्यात बुडाल्याने 4 मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील बहराइच जिल्ह्यात नानपारामध्ये कालव्यामध्ये 6 मुले अंघोळीला गेले होते. पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलीस आणि गावातील लोकांच्या मदतीने 2 मुलांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. तर 3 मुली आणि 1 मुलगा यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
सूचना मिळताच वेळेवर पोहचलेल्या पोलिसांनी खूप मेहनतीने एक मुलगा आणि तीन मुलींचे मृतदेह बाहेर काढले. तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.
घटना नानपारा परिसरात गिरधरपुर येथील सांगितली जात आहे. जिथे हे मुले ऊन असल्यामुळे अंघोळ करण्यासाठी या कालव्यात उतरले होते. तिथे ही सर्व घटना घडली.
या घाटाने बद्दल डीएम बहराइच मोनिका रानी या म्हणाल्या की, मुलांचे पोस्टमार्टम केले गेले आहे. कुटुंबाला आर्थिक मदत गुरुवारी देण्यात येईल. बेजवाबदारपणे वागल्यास या घटना घडतात. या करिता आपल्या मुलांना खोल पाण्यात जाण्यापासून थांबवावे.