जलपायगुडी जिल्हा केके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून सकाळी साडेदहाच्या सुमारास आई गमावून बसलेल्या मुलाने रुग्णवाहिका चालकाशीआईचा मृतदेह नेण्यासाठी बोलणी करत होता. मात्र चालकांकडून त्याच्याकडून तिप्पटीने भाडे घेतले जात होते. त्याच्या कडे एवढे पैसे नव्हते.त्याने वडिलांसोबत पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे कांती गावात आईचा मृतदेह खांद्यावर ठेवून पायी चालायला सुरु केले.
आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन मुलगा सुमारे 50 किलोमीटर चालत होता. इंडिया टुडेशी बोलताना मृत महिलेचा मुलगा जय कृष्ण दिवाण म्हणाला, “मी माझ्या आईला रुग्णालयात घेऊन आलो तेव्हा रुग्णवाहिकेने सुमारे 900 रुपये घेतले. मात्र, यावेळी रुग्णवाहिका चालकाने मृतदेह वाहून नेण्यासाठी 3000 रुपयांची मागणी केली. मी त्याला अजून थोडे पैसे घे म्हणून सांगितले, पण तो मान्य झाला नाही.