नियम पाळा किंवा कारवाईस तयार, भारताचा ट्विटरला इशारा

रविवार, 6 जून 2021 (12:04 IST)
भारतातील नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार भारतात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटरला भारत सरकारनं 'अखेरची नोटीस' पाठवलीय. यानंतर ट्विटरकडून कुठले पाऊल उचललं गेलं नाही, तर फौजदारी कारवाईचा इशारा भारत सरकारनं दिलाय. 
 
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना 26 मे 2021 पर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक होते.

ट्विटरला वारंवार सूचना देऊनही ट्विटरने नियमांच पालन करण्यास नकार दर्शवलाय. त्यामुळे 'अखेरची नोटीस' भारत सरकारकडून पाठवण्यात आलीय.
 
यानंतर अद्याप ट्विटरनं आपली भूमिका जाहीर केली नाहीय. त्यामुळे ट्विटरकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती