कानपूर आयआयटीने या कारची निर्मिती करण्यासाठी विटॉल एविअॅशन कंपनीबरोबर १५ कोटींचा करार केला आहे. या कराराप्रमाणे एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभाग पाच वर्षांच्या आत ८०० ते १००० किलोग्रॅमचे प्रोटोटाईप मॉडेल तयार करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत या कारची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत कारखानाही उभारण्यात येणार आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत या कारची निर्मिती करण्यात येत आहे. ही कार टू सीटर असून ती किमान दहा हजार फूट व कमाल १२ हजार फूट उंचावर उडू शकणार आहे. वीज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कारची निर्मिती करण्यात येत आहे. ९० ते १०० मीटर प्रतिसेकंद असा या कारचा वेग असणार आहे. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खास सोय करण्यात येणार आहे.
आयआयटी कानपूरने १० मे रोजी २० किलोग्रॉम वजनाच्या मानवरहित उडत्या कारची यशस्वी चाचणी केली होती. २० मिनिटं ही कार हवेत उडत होती. यासाठी लार्सन अँड ट्युब्रो कंपनीने मदत केली होती, असे आयआयटी कानपूरच्या एअरोस्पेस विभागाचे प्रमुख प्राध्यापक ए.के. घोष यांनी सांगितले आहे.