आधी मटन मागितले मग अंत्यसंस्कार केले

बुधवार, 20 मार्च 2024 (12:10 IST)
अंत्यसंस्काराच्या आधी सामूहिक भोजनासाठी मटण दिले नाही म्हणून एका वृद्ध महिलेवर अंत्यसंकार करू न देण्याची घटना ओडिशाच्या मयूरभंज तेलबिला येथे घडली आहे. या गावात प्रथा आहे की एखाद्या कडे कोणी गेल्यावर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंकराच्या आधी गाव जेवण दिले जाते. या गावात राहणाऱ्या सोम्बारी सिंह नावाच्या एका 70 वर्षीय मृत महिलेचे निधन झाले.

गावात लग्नात आणि मृत्यू वेळी सामूहिक जेवण देण्याची प्रथा असल्यामुळे महिलेच्या मुलाची आर्थिक परिस्थिती नव्हती.गावकऱ्यांनी कुटुंबियांकडून 10 किलो मटणाची मागणी केली. जे पूर्ण करण्यासाठी ते असमर्थ होते. मटण मिळाले नाही या कारणामुळे गावकरांनी महिलेच्या अंत्यसंकारासाठी सामील होण्यासाठी नकार दिला.

त्यांनी सोम्बारीच्या मुलाकडे 10 किलो मटणाची मागणी ठेवली. मटणाची व्यवस्था करायला महिलेच्या मुलाला दोन दिवस लागले. दोन दिवसांपर्यंत  महिलेचा मृतदेह घरातच पडून होता. महिलेचा पार्थिवावर दोन दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की मयत महिलेने घरात दोन कार्ये करून देखील गावाला सामूहिक जेवण दिले नाही. याचा राग गावकऱ्यांच्या मनात होता. म्हणून या वेळी त्यांनी मटणाची अट ठेवली. 
 
Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती