दिल्लीतील टिळक नगरमधील कार शोरूमवर गोळीबार

मंगळवार, 7 मे 2024 (00:30 IST)
सोमवारी सायंकाळी टिळक नगर भागातील एका कार शोरूममध्ये हल्लेखोरांनी गोळीबार करून खळबळ उडवून दिली. गोळीबारात शोरूमच्या काचा फुटून अनेक जण जखमी झाले. 
हल्लेखोराने घटनास्थळी नोट फेकून गेले त्यावर नवीन बाली, भाऊ गॅंग आणि नीरज फरीदपूर यांची नावे लिहिली आहे. रक्कम उघड केली नाही. हल्लेखोरांनी या कारच्या शोरूम मध्ये अनेक राउंड गोळीबार केला. या मध्ये तीन जण जखमी झाले आहे. 
 
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास टिळक नगर येथील कार शोरूम फ्युजनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. 

दुचाकीवरून चार हल्लेखोर शोरूम जवळ आले आणि त्यापैकी दोघे शोरूमच्या आत शिरले आणि नंतर बाहेर गेले आणि बाहेरून त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या मध्ये एकाच्या चेहऱ्यावर गोळी लागली. या गोळीबारात कार शोरुमचा मालक थोडक्यात बचावला. गोळीबार मध्ये हल्लेखोरांनी डझनहून अधिक गोळ्या झाडल्या. ळीबार होताच तेथे गोंधळ उडाला. या गोळीबारात आणखी दोन जण जखमी झाले आहेत. गुन्हे आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून तपास केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
 
Edited By- Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती