मध्य प्रदेशातील मुरैना येथे शनिवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यात हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराज 2000 क्रॅश झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले, जेथे सराव सुरू होता