प्रभारी निरीक्षक अजित कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, मयत ओम प्रकाश याने 21 नोव्हेंबर रोजी पत्नी संगम यादव घरातून निघून गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली असून आपल्या 14 महिन्यांच्या जुळ्या मुलींनाअशी आणि प्रियांशी यांना सांभाळले त्रासदायक होत होते. घरात मुलींचा सांभाळ करायला कोणीच नव्हते. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता.
नंतर लोकांनी त्याला झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितल्यावर घरी सांगण्यासाठी गेले असता तेथे हे दृश्य पाहून लोकांना धक्का बसला आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. श्रीवास्तव म्हणाले की, तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.