फेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार

बुधवार, 11 एप्रिल 2018 (15:31 IST)
आता फेअरनेस क्रीम्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकत घेता येणार नाहीत. राज्य सरकारने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असेलेल्या फेअरनेस क्रीमच्या सरसरकट विक्रीवर बंदी घातली आहे. फेअरनेस क्रीम तयार करणाऱ्या कंपन्यांनी या नियमांचं पालन केलं नाही तर कंपनीला एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. डेसोनाईड, बेक्लोमेथासोनसह अन्य 14 घटकांचा समावेश असेलेली क्रीम्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय चेहऱ्याला फासणं धोकादायक आहे. सरकारच्या या निर्णयाचं डॉक्टरांनी मात्र स्वागतच केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती