पोलिसांनी सांगितले की, सांबा जिल्ह्यातील बिश्नाह येथील लालियाना गावातील एका शेतात हा स्फोट झाला. स्फोटामुळे शेतात खड्डा तयार झाला आहे. विजेमुळे हा स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. जाहीर सभेच्या ठिकाणी दक्षता वाढवण्यात आली आहे. एसपी हेड क्वार्टर रमनीश गुप्ता, एसडीपीओ आरएसपुरा सुरेंद्र सिंह आणि एसएचओ बिश्नाह विनोद कुंडल स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त, पंतप्रधान सांबा जिल्ह्यातील परगणामधून देशभरातील पंचायत प्रतिनिधींना संदेश देतील. अनेक अर्थांनी महत्त्वाच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मोदी राज्याला काही मोठी भेट देऊ शकतात.