जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, अनंतनागच्या ऋषीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने परिसराला वेढा घातला. स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून लष्करही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.