Election Results 2023 : हा नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी, गरीबांचा ऐतिहासिक विजय- नरेंद्र मोदी
रविवार, 3 डिसेंबर 2023 (20:44 IST)
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजपने मध्य प्रदेशात 160 तर राजस्थानमध्येही बहुमताचा आकडा पार केला आहे. छत्तीसगडमध्येही भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर तेलंगणात काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेत येताना दिसत आहे.
तीन राज्यांत भाजपाला मोठं यश मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना अभिवादन. दिल्लीमध्ये भाजपाच्या मुख्यालयामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या लोकांनी भाजपावर भरपूर स्नेह दाखवला. तेलंगणातही भाजपाप्रती समर्थन सतत वाढत आहे. त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करतो. हे सगळं पाहाता माझी वैयक्तिक जबाबदारी आणखी वाढते अशी माझी भावना आहे. मी आपल्या माता, बहिणी, युवा, मुली, शेतकरी बांधव यांनी जे आम्हाला समर्थन दिलं, त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो.
या निवडणुकीनं देशाला जातीत विभागण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी सतत हेच सांगत होतो की माझ्यासाठी 4 जातीच मोठ्या आहेत. त्या म्हणजे नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब परिवार याच त्या जाती. त्यांना सशक्त केलं तरच देश सशक्त होईल.
आज आमचे सहकारी आदिवासी आणि ओबीसी मोठ्या संख्येने आहेत. आज प्रत्येक गरीब व्यक्तीला आपणच जिंकलो असं वाटत आहे. शेतकऱ्यांना आपण जिंकलोय असं वाटतंय.आदिवासी भाऊ-बहिणींना आपला विजय झालाय असं वाटतंय. प्रथम मतदान करणारेही माझं पहिलं मत मला विजय मिळवून देणारं ठरलंय असा विचार करत आहेत. आज स्त्रिया आणि युवावर्गही या निवडणुकीत स्वतःचा विजय पाहात आहे. प्रत्येक नागरिक यात स्वतःचं यश पाहातोय.
भाजपाचा झेंडा फडकवणारच या विचाराने नारीशक्ती घराबाहेर पडली आणि त्यांनी संरक्षण दिलं की कोणतीही शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. प्रत्येक महिलेमध्ये भाजपा सरकारमध्ये त्यांच्या सक्रीय भागिदारीला नवं स्थान मिळणार आहे हा विचार आला आहे. भाजपाच महिलांचा सन्मान, महिलासुरक्षेची सर्वात मोठी गॅरंटी बीजेपीच आहे हे महिलांना समजलं आहे.
पीएम मोदी म्हणाले - या निवडणुकांची प्रतिध्वनी जगभर ऐकू येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'या निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण मी सतत सांगत होतो की माझ्यासाठी फक्त 4 जातीच देशातील सर्वात मोठ्या जाती आहेत. जेव्हा मी या चार जाती, आपल्या महिला, तरुण, शेतकरी आणि आपल्या गरीब कुटुंबांबद्दल बोलतो, तेव्हा या चार जातींना सशक्त करूनच देश मजबूत होणार आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपला राजीनामा राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्याकडे पाठवला आहे. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी ही माहिती दिली. केटी रामाराव म्हणाले की हे निकाल आमच्या पक्षाला हवे होते असे नाहीत परंतु बीआरएसला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष तेलंगणातील जनतेचे आभार मानतो. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी पुढचे सरकार स्थापन होईपर्यंत या पदावर कायम राहण्याचे आवाहन केले.
भाजप मुख्यालयातील भाषणात पीएम मोदी म्हणाले - आज प्रामाणिकता, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय झाला आहे.पीएम मोदी म्हणाले- भाजपचा हा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे.