मूगाच्या डाळीपासून अंड्याची निर्मिती

आता लवकरच मूगाच्या डाळीपासून अंड्याची निर्मिती करण्यात येणार आहे. हे अंडे शाकाहारी असल्याने ते शाकाहारी व्यक्तींनाही खाता येणार आहे. एका प्रसिद्ध नामांकित कंपनीने गेल्यावर्षी अंड्यासाठी पर्याय म्हणून मूग डाळीचा वापर केला होता. गेल्यावर्षी या कंपनीने अमेरिकेतील बाजारात हे अंडे विक्रीस ठेवले होते. त्या ठिकाणी अंड्याच्या या शाकाहारी पर्यायाला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कंपनी आता लवकरच भारतीय बाजारात मूग डाळीपासून बनवलेलं शाकाहारी अंडे विक्रीस ठेवणार आहे. 
 
काही वर्षांपूर्वी सोयाबीनच्या झाडापासूंन शाकाहारी अंड्याची निर्मिती केली गेली होती. हे अंडे दिसायला कोंबडीच्या अंड्याप्रमाणेच होते. पण याची चव थोडी वेगळी होती. या अंड्यातील पिवळा बलक हा वनस्पती तेल आणि काही विशिष्ट जेलपासून तयार करण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती