जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले,तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 मोजली

मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (11:02 IST)
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, बारामुल्ला आणि कुपवाडामध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजली गेली. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बारामुबाला येथे आज सकाळी 6.45 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू बारामुल्लापासून 74 किमी अंतरावर जमिनीपासून पाच किलोमीटर आत होता त्याची तीव्रता 4.9 एवढी होती. दुसरा भूकंप 6.52 मिनिटांनी झाला. त्याचा केंद्रबिंदू बारामुल्लापासून 74 किमी अंतरावर 10 किमी भूगर्भात होता. त्याची तीव्रता 4.8 इतकी नोंदवली गेली.  
 
पुंछ आणि बारामुल्ला आणि कुपवाडा परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेकजण भीतीने घराबाहेर पडले. मात्र या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती