दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के, लोकांमध्ये भिती

शुक्रवार, 2 जून 2017 (11:00 IST)
राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागात मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के पहाटे साडेचारच्या सुमारास बसले. राजधानीबरोबरच एनसीआर, हरियाणातील रोहतक परिसरातही हदरला. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अजून आलेले नाही. या भूकंपाचे केंद्र रोहतक येथे असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
 
भूंकपाच्या जोरदार धक्‍क्‍यांमुळे इमारती हल्ल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, साखरझोपेच्या वेळी भूकंप झाल्याने उत्तर भारतात भितीचे वातावरण पसरले होते

वेबदुनिया वर वाचा