मेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर

शनिवार, 26 मे 2018 (17:32 IST)
महिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची सुरक्षा हे पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हानच असते.

सुरक्षा ठेवताना आता पोलिसांचा  मेहनतीला अत्याधुनिक तंत्राची जोड मिळणार असून, मुंबईवर मानवरहित ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे.‘सेफ सिटी’ प्रकल्पांतर्गत हे सुरक्षा उपाय करण्यात येणार आहे. जेव्हा एखादी महिला असुरक्षित वाटली की लगेच धोक्याची सूचना देणारी ‘पॅनिक बटणे’ शहरभर लावली जाणार आहेत. भुयारी मार्ग आणि स्कायवॉक्सवर दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्रीय गृहखात्याने मोठय़ा शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून, प्रकल्पाचा 60 टक्के खर्च केंद्र सरकार देणार आहे. मुंबईत त्यासाठी 252 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती