जगातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड ठिकाण भारतात

श्रीनगर- भारतासारखा दुसरा अनोखा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य आहे. याचे कारण म्हणजे जगभरातील सर्व वैविध्य आपल्याला याच एका देशात सापडते. इथे वाळवंटही आहे आणि बर्फाळ भागही. समुद्रही आहे आणि मैदानी प्रदेशही. सर्वाधिक पावसाचे ठिकाणही आहे आणि कोरडी ठिकाणही. केवळ भाषा, राहणीमान, चालीरिती यांचेच नव्हे तर भौगोलिक आरि हवामानाच्या बाबतीत असलेली विविधताही आपल्या देशात पाहायला मिळते. तरीही या विशालकाय देशात विविधतेतून एकता साधणारे एक सूत्र आहे भारतीयता...
 
एरवी पाशाचात्त्य लोक भारताला उष्ण देश समजत असतात. मात्र, याच उष्ण देशात जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात थंड ठिकाणही आहे. या ठिकाणाचे नाव आहे द्रास. जम्मू- काश्मीरमध्ये हे द्रास नावाचे ठिकाण आहे. कारगिल जिल्ह्यातील या छोट्याशा शहराची मोठी ओळख आहे. हिवाळ्यात द्रासचे तापमान उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत उतरते. 1995 मध्ये द्रास येथे उणे 60 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती