दिग्विजय सिंग यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढले

सोमवार, 28 मे 2018 (14:52 IST)
ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढून टाकले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे असलेला आंध्र प्रदेशच्या प्रभारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस तिथे सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्यामुळे भाजप तिथे सत्तेवर आला. दिग्विजय सिंग हे गोव्याचे प्रभारी असतानाच हे घडले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती