अटकेनंतर तीन तासांतच विजय माल्याची सुटका

मंगळवार, 18 एप्रिल 2017 (21:31 IST)
विजय माल्याला भारत सरकारच्या अर्जीच्या आधारावर लंडनमध्ये अटक करण्यात आले आणि त्याला लगेचच जामिनावर मुक्तता करण्यात आली. ब्रिटिश कायद्यानुसार असे वाटत आहे की माल्याला भारतात आणणे अद्याप दूरची कौडी आहे. माल्याकडे भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींचे कर्ज थकित आहे. तसेच त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गंभीर स्वरूपाचे आर्थिक गुन्हे दाखल झालेले आहेत.  
 
माल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून अटक केली. अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याच्या भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण माल्याला वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले असता तेथे कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर  'माझ्या अटकेचे भारतातील प्रसारमाध्यमांनी अवास्तव वृत्तांकन केले. प्रत्यार्पणाच्या खटल्याची आज सुनावणी सुरू झाली आहे,' असे ट्विट करत माल्याने प्रसारमाध्यमांवर टीका केली.  
 
माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 9 फेब्रुवारी रोजी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला होता. 'माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे', अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीत   सीबीआय न्यायालयाने 720 कोटी रुपयांचे आयडीबीआय बँक लोन डिफॉल्ट प्रकरण्यात माल्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला होता. 

वेबदुनिया वर वाचा