मतदारांच्या मदतीला वेगवेगळे अ‍ॅप आणि हेल्पलाइन

शनिवार, 2 मार्च 2019 (08:55 IST)
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आणि राजकीय पक्षांना विविध परवानग्या घेण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या अ‍ॅपची घोषणा केली आहे. या अंतर्गत ‘द व्होटर हेल्पलाइन’या मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना मतदार यादीतील नावे शोधता येतील. सोबतच आॅनलाइन नावनोंदणीचा अर्ज करतानाच अर्जाची सद्य:स्थितीही पाहता येईल. या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रत्येक प्रकारचा अर्ज, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, प्रेसनोट आदी महत्त्वाच्या सूचना मिळतील. याशिवाय मतदारांसाठी १९५० ही हेल्पलाइनही कार्यरत असेल. यासोबतच एनव्हीएसपी पोर्टलच्या मदतीने मतदारांना नाव वगळणे, पत्त्यात बदल आदी कामे सहज करता येतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती