बाबांच्या दर्शनासाठी रात्री एक वाजल्यापासूनच भाविकांच्या रांगा लागल्या. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. यानंतर सकाळी ठीक7 वाजता धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी संपूर्ण केदारनाथ परिसर बाबांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. सकाळी दहापर्यंत संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.बाबा केदार यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.