देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दीड वर्षाचा मुलगा वॉशिंग मशिनमधील साबणाच्या पाण्यात पडला, त्यानंतर सुमारे 15 मिनिटे साबणाच्या पाण्यात बुडून राहिला. त्याला बाहेर काढले तेव्हा तो पूर्णपणे निळा झाला होता. तब्बल 12 दिवसांच्या संघर्षानंतर डॉक्टरांनी मुलाचे प्राण वाचवले आहेत.
मुलावर उपचार करणाऱ्या फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, बाळ आता ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितले की, मुलाला हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा तो बेशुद्ध होता. त्याचे शरीर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हते आणि श्वासोच्छ्वास नीट चालत नव्हता. तो पूर्णपणे निळा झाला होता. त्याच्या हृदयाचे ठोके तुटत होते. रक्तदाब जवळजवळ संपला होता.
खेळता खेळता मुल वॉशिंग मशिनमध्ये पडला
मुलाच्या आईने सांगितले की मुल टॉप लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये पडला होता आणि 15 मिनिटे साबणाच्या पाण्यात बुडलेला होता. मुलाची आई बाहेर होती आणि खुर्चीचा वापर करून वॉशिंग मशीनवर चढण्याच्या प्रयत्नात तो पडला. त्याची आई परत आली तेव्हा मुलगा कुठेच दिसत नव्हता. अखेर दीड वर्षाचा निष्पाप जीव साबणाच्या पाण्यात बुडूलेला सापडला. डॉक्टरांचे म्हणणे आहे की मूल 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ पाण्यात बुडलेला असावा अन्यथा त्याचे जगणे कठीण झाले असते.
साबणयुक्त पाण्यामुळे मुलाच्या शरीरातील अनेक भाग खराब झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांना न्यूमोनिया झाला होता. याशिवाय अनेक प्रकारचे गंभीर आजार शरीरात भरले होते. योग्यवेळी उपचार सुरू झाल्याने मुलाचे प्राण वाचू शकले. सुरुवातीला त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते पण जेव्हा तो त्याच्या आईला ओळखू लागला तेव्हा त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले.