डिलेव्हरी बॉय गैर हिंदू असल्यामुळे जेवण घेण्यास नकार, सोशल मीडियावर वाद

जबलपूर- ऑनलाईन बुकिंगनंतर ऑर्डर घरी पाठवण्यात आलं परंतू ऑर्डर करणार्‍याने घेण्यास नकार दिला कारण डिलेव्हरी बॉय हिंदू नव्हता. यानंतर सोशल मीडियावर याबाबद वाद सुरू झाला आणि हे प्रकरण इतकं चिघळलं की आता सेलिब्रटीजदेखील यावर आपले कमेंट्स देत आहेत.
 
जबलपुरमध्ये राहणार्‍या अमित शुक्ला यांनी Zomato हून ऑनलाईन ऑर्डर करून खाद्य पदार्थ मागवले परंतू श्रावणाच्या महिना असल्यामुळे मुस्लिम डिलेव्हरी बॉयच्या हातून ते पदार्थ घेण्यास नकार दिला. यानंतर अमित शुक्ला यांनी ट्विट केलं की मी आता झोमाटोचा ऑर्डर रद्द केला कारण ते माझं जेवण एका हिंदू राइडरच्या हाती पाठवत होते. मी त्यांना राइडर बदलण्यासाठी देखील म्हटलं ते तर झाले नाही परंतू ते माझा पैसा देखील परत करायला तयार नाही. मी त्यांना म्हटले की ते मला असे जेवण करण्यासाठी बाध्य करू शकत नाही, हवं तर मला माझं पैसा परत करू नका.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालं प्रकरण : हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला काही क्षणच लागले. यावर झोमाटोने दिलेल्या प्रत्युत्तराची सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जातं आहे.
 
झोमाटोने उत्तर दिले की अन्नाचा धर्म नसतं, अन्न स्वत: एक धर्म आहे. प्रकरण वाढत असल्याचं बघून झोमाटोचे मालक दिपेंदर गोयल यांनी देखील ट्विट केलं की आम्हाला भारताच्या या विचारावर अभिमान आहे, आमच्या वेगवेगळे ग्राहक आणि वेगवेगळे साथी आणि त्यांच्या भिन्नतेवर आम्हाला आनंद आहे आणि मूल्यांमुळे कुठलेही नुकसान होत असल्यास अशा नुकसानाची काळजी नाही.
 
काँग्रेसचे दिग्गज नेता पी चिदंबरम यांनी देखील झोमाटोच्या समर्थनात ट्विट केले. चिदंबरम यांनी लिहिले की मी आता पर्यंत झोमाटोहून जेवण ऑर्डर केलं नाही परंतू आता याकडूनच ऑर्डर करेन अशा विचार आहे.
 
चिदंबरम यांच्या ट्विटवर भाजप प्रवक्ता तेजिंदर पाल बग्गा यांनी टीका करत लिहिले की ते (झोमाटो) जेलमध्ये डिलेव्हरी देत नाही.
 
माजी निवडणूक आयुक्त एसव्हाय कुरैशी यांनी झोमाटोचे मालक दीपेंद्र गोयल यांना भारताचा रिअल हीरो करार दिला. त्यांनी लिहिले की 'दीपेंद्र गोयल यांना सलाम, आपण भारताचे खरे नायक आहात आपल्यावर अभिमान आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती