पायलट यांना परत आणण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न सुरु

बुधवार, 15 जुलै 2020 (15:32 IST)
सचिन पायलट यांना माघारी बोलवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरू केले आहेत. पायलट यांच्यासाठी पक्षानं दरवाजे बंद केलेले नाहीत, अशा शब्दांत राजस्थानकाँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडेंनी पायलट यांना साद घातली आहे. पायलट यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसनं त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 
 
राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडेंनी ट्विट करून पायलट यांच्याबद्दलची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 'पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. देवानं त्यांना सद्भुद्धी द्यावी आणि त्यांना त्यांची चूक लक्षात यावी. भाजपाच्या जाळ्यातून त्यांनी बाहेर यावं, अशी माझी प्रार्थना आहे', असं पांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावरून काँग्रेस पायलट यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट झालं आहे.   
 
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची काल काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती