देशात कॉण्डोमचा वापर घटला

नवी दिल्ली- देशात कॉण्डोम वापराचे प्रमाण मोठ्या वेगाने घटत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्यखात्याने या बाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने ही स्थिती चिंताजनक मानली जात आहे.
 
आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार देशातील 34 पैकी 22 मोठ्या शहरांमध्ये कॉण्डोमचा वापर कमी झाला आहे. यात प्रामुख्याने अंदमान- निकोबार बेटांचा समूह, मध्यप्रदेश, सिक्कीम, केरळ आणि हरियाणाचा समावेश आहे. कॉण्डोमचा वापर घटलेल्या राज्यांमध्ये केरळचा क्रमांक सर्वाधिक आहे. या राज्यातील कॉण्डोम वापराचे प्रमाण 33 टक्क्यांनी घटले आहे.

वेबदुनिया वर वाचा