गाझियाबादमधील हर्ष विहार-2 भागातील एका घरात एलईडी टीव्हीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात एक 16 वर्षीय किशोर ठार झाला, तर कुटुंबातील इतर दोन सदस्य जखमी झाले आहेत. जखमींना दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी निरंजनची पत्नी ओमवती, मुलगा ओमेंद्र आणि ओमेंद्रचा मित्र करण हे घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत एलईडी टीव्हीवर कार्यक्रम पाहत होते. निरंजन यांची सून मोनिका यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एलईडीमध्ये अचानक स्फोट झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.