करोना: 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी

गुरूवार, 2 एप्रिल 2020 (15:14 IST)
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हरयाणा या राज्यात 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी करण्यात आली आहे. हरयाणाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही माहिती दिली. 
 
केवळ च्युइंगम चघळण्यावरच नव्हे तर विकण्यावर तसेच खरेदीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. च्युइंगम चघळून थुंकलं तर करोनाचा प्रसार वाढण्यासाठीचं ते कारण ठरु शकतं त्यासाठी ही खबरदारी घेतली गेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती