साप काळा, राखाडी किंवा इतर रंगाचे असू शकतात. पण सध्या हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आजकाल एका पांढऱ्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा साप सुमारे पाच फूट लांब होता आणि चंबा जिल्ह्यात झाडाझुडपांमध्ये रेंगाळताना दिसला.हा पांढरा साप एका खडकाभोवती स्वतःला गुंडाळून आणि शेवटी झाडाच्या फांद्याभोवती वळसा घालून जमिनीवर हळूहळू रेंगाळताना दिसला. हे पाहिल्यानंतर स्थानिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा अल्बिनो साप असू शकतो असे मानले जाते. याआधी पुण्यातही अल्बिनो साप दिसला.