महाकुंभात आलेल्या महिलांचे स्नान करतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करुन त्यांची विक्री करणाऱ्या दोन सोशल मीडिया अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाकुंभात आलेला महिला व मुलींचे स्नान करताना व कपडे बदलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचे तपासात समोर आले असून हा महिलांच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.