मोदींना शुभेच्छा देताना कॅनडाच्या पंतप्रधानांकडून मानवाधिकार आणि विविधतेचा उल्लेख

गुरूवार, 6 जून 2024 (15:03 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन जस्टिन ट्रूडो यांनी मोदींचं अभिनंदन केलं आहे.
 
कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना त्यांनी लिहिलं की, "निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन. मानवाधिकार, विविधता आणि कायद्याचं राज्य या मूलभूत तत्वांवर आधारलेले दोन्ही देशांसह संबंध अधिक मजबूत होण्यासाठी आम्ही मोदी सरकारसोबत काम करण्यास तयार आहोत."
 
या निवेदनात कॅनडाने म्हटलं आहे की, “भारतातील लोकशाही प्रक्रियेचे प्रमाण आणि व्याप्ती ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. काही आठवड्यांच्या कालावधीत, लाखो लोकांनी मतदान केलं, इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत एवढं मतदान होणं हा एक विक्रम आहे. कॅनडामध्ये 13 लाख हिंदू राहतात."
 
कॅनडात हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. कॅनडाने निज्जरच्या हत्येमागे भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. हा आरोप भारताने फेटाळून लावला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती