मिळालेल्या माहितीनुसार द्वारका ते वैशाली आणि नोएडापर्यंत जाणाऱ्या दिल्ली-नोएडाच्या सर्वात व्यस्त ब्लू लाईनवर ही घटना घडली आहे. केबल चोरीची ही घटना कीर्ती नगर ते मोती नगर दरम्यान घडली. ही घटना रात्री घडली असून जेव्हा मेट्रो सेवा आधीच संपली होती. चोरीला गेलेल्या केबल्समुळे मेट्रो सिग्नल आणि दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे, त्यामुळे मेट्रोच्या कामकाजात विलंब होत आहे. ब्लू लाइन मेट्रो सेवा आता पूर्वीपेक्षा मंद झाली असून प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागू शकते. अशी माहिती समोर येत आहे.